HW News Marathi
देश / विदेश

सुरक्षा हटविल्यानंतर फुटीरवादी नेता यासिन मलिकला अटक

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर येथील फुटीरवाद्यांवर कारवाईला सुरुवात झाली असून शुक्रवार (२२ फेब्रुवारी) रात्री जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) प्रमुख यासीन मलिक याला ताब्यात घेण्यात आले आहे. यासिन मलिक याला कोठीबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. अनुच्छेद ३५-ए वर सर्वोच्च न्यायालयात २६ फेब्रुवारीच्या दरम्यान सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यासिन मलिक ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याआधी बुधवारी (२२ फेब्रुवारी) यासीन मलिक याला दिलेली सुरक्षा देखील राज्य सरकारने हटविली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यूझीलंडमध्ये मशिदीत अंदाधुंद गोळीबार, बांग्लादेशची क्रिकेट टीम थोडक्यात बचावली

News Desk

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम !

News Desk

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस

News Desk