HW News Marathi
देश / विदेश

Unnao Rape : पीडित तरुणींची मृत्यूशी झुंज अपयशी

नवी दिल्ली । उन्नावमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेला दोन दिवसांपूर्वी (५ डिसेंबर) आरोपींनी पेट्रोल ओतून जिवंत जाळले होते. या पीडित तरुणींनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात काल (शुक्रवार ६ डिसेंबर) रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. रायबरेलीतून सुनावणीसाठी जाताना तिला आरोपींनी जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती ९० टक्के भाजली गेली होती. तिला लखनऊवरुन विमानाने दिल्लीला आणण्यात आले होते. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी पीडित तरुणींला विमानतळ ते सफदरजंग रुग्णालयात ग्रीन कॉरीडोर तयार केला होता.

रुग्णालयामध्ये मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबानीनत तिने पाच जणांची नावे सांगत आरोपींनी आपल्यावर चाकूने हल्ला करत पेट्रोल ओतून पेटवल्याचा दावा केला होता. या पाच जणांमधील दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ते नुकतेच जामिनावर सुटून बाहेर आले होते. त्यानंतर तिघांनी साथीदारांच्या मदतीने त्यांनी पीडितेला जाळले. शिवम त्रिवेदी, शुभम त्रिवेदी या बलात्काराच्या आरोपींसह हरिशंकर द्विवेदी, रामकिशोर त्रिवेदी आणि उमेश वाजपेयी यांनी तिला जाळल्याचा आरोप आहे.

उन्नाव अपहरण करुन तरुणीवर सामूहिक बलात्कार

डिसेंबर २०१८ मध्ये पीडितेचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. लग्नाच्या आमिषाने शिवम त्रिवेदी याने आपले शारीरिक शोषण केल्याचा दावा पीडितेने केला होता. त्यानंतर तरुणींने न्यायासाठी उन्नाव गावात पंचायत बोलावली गेली. यावेळी शिवमने माघार घेतली होतीच, मात्र तीन लाख रुपये देण्याचे सांगत त्याने पीडितेला पिच्छा सोडण्याची ताकीद दिली. अखेर ती न ऐकल्याने शिवमने शुभम त्रिवेदीच्या मदतीने तिचे अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनसे’ची मतं आमच्याशी जुळली तर नक्कीच…! फडणवीसांनी दिले नवे संकेत

News Desk

कर्नाटकात सरकार स्थापन करण्यास आम्ही तयार !

News Desk

मोठी बातमी ! विशेष न्यायालयाकडून सचिन वाझेंना १० दिवसांची NIA कोठडी

News Desk