HW News Marathi
देश / विदेश

भीषण स्फोटात इमारत जमीनदोस्त, सात ठार

बेंगळुरू(वृत्तसंस्था): बंगळुरूमधील उपनगरातील इजीपुरा येथे सिलिंडरचा स्फोट होऊन रहिवासी इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे ७ जण ठार झाले. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत एक तीन वर्षीय मुलगी बचावली असून तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रयत्नानंतर ढिगाºयाखाली अडकलेल्या या मुलीला बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले कर्नाटकचे मंत्री के जे जॉर्ज यांनी मुलीला राज्य सरकारने दत्तक घेतल्याचे घोषित करत तिचा सर्व खर्च करणार असल्याचे म्हटले. या घटनेतील जखमींचाही आकडा वाढू शकतो. दरम्यान, या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटी म्हणजे दहशवतवादी कर

News Desk

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना, जे. पी. नड्डा यांची घेणार भेट

News Desk

#PulwamaAttack : शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील २ सुपुत्रांचा समावेश

News Desk