तिरुवनंतपुरम । केरळच्या शबरीमाला डोंगरावरील अय्यप्पा मंदिरात महिलेच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात तणावाचे वातावरण सुरु आहे. मंदिराच्या परिसरात जमाव बंदी लागू केली आहे. केरळमधील निल्लकल, पंपा, एल्वाकुलम, सन्निधनम या भागात कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज (१८ ऑक्टोबर) शबरीमाला संरक्षण समितीने १२ तासाच्या बंदीची घोषणा केली आहे. आंतराराष्ट्रीय हिंदू परिषद, भाजप अन्य संघटनांनी या बंदला समर्थन दिले आहे. परंतु काँग्रेस या बंदमध्ये सहभागी होणार नाही.
In some temples,there are rituals which must be followed strictly.Court is giving order for all women to enter but from last 50-70 yrs,no women b/w 10-50 yrs of age visited temple. It's our belief which we follow in Hinduism:Devotee at Sannidhanam Temple,Kerala. #SabarimalaTemple pic.twitter.com/5I8qXOP2fT
— ANI (@ANI) October 18, 2018
मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकरणाऱ्यांनी बुधवार सकाळपासूनच मंदिर परिसरात जोरदार निदर्शने केली होती. महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिर महिनाभराच्या धार्मिक विधींसाठी बुधवारी सायंकाळी प्रथमच प्रचंड तणावाच्या वातावरणात उघडले गेले.
We demand an ordinance in this regard from both state as well as Centre, especially for #SabrimalaTemple: Prayar Gopalakrishnan, Former Travancore Devaswom Board President at Sannidhanam Temple, Kerala. pic.twitter.com/yGUAOa3ggW
— ANI (@ANI) October 18, 2018
शबरलीमाला प्रकरण
केरळमध्ये सबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशाची बंदी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार व्हावा यासाठी आम्ही याचिका करू त्याबाबत पंडालम राजघराण्याची भूमिका समजून घेऊन आणि त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा करू, असे चेंगनूर यांनी सांगितले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ठराविक वयातील महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेशाची असलेली बंदी २८ सप्टेंबर रोजी बेकायदा ठरविली होती. याआधी ‘सबरीमाला मंदिराकडून महिलांबरोबर कोणताही भेदभाव केला जात नसून धार्मिक बाबतीत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये,’ अशी उलट भूमिका मंदिर प्रशासनाने घेतली होती.
Amid intensifying protest in the region against the entry of women in the menstrual age group in the Sabarimala temple, the state administration has imposed Section 144 in four places– Sannidhanam, Pamba, Nilakkal, and Elavungal
Read @ANI story | https://t.co/QBfdTia0WG pic.twitter.com/CswKmFRYVx
— ANI Digital (@ani_digital) October 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.