निलाक्कल | सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतिहासात प्रथमच शबरीमाला येथील आय्यपा मंदिराचे दरवाजे आज (१७ ऑक्टोबर)ला सायंकाळी महिलांसाठी प्रथमच खुले करण्यात आले. या पार्श्वभूमीवर निल्लाकल, पंबा आणि सन्निधनम या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १ हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
#WATCH: Prayers being offered at #SabarimalaTemple after its portals opened at 5 pm; devotees can offer prayers till 10.30 pm today. #Kerala pic.twitter.com/rBuneRDatN
— ANI (@ANI) October 17, 2018
महिला मंदिरात प्रवेशासाठी येण्याचा प्रयत्न करत असताना अनेक आंदोलकांनी विरोध केला होता. तसेच या सर्व मंदिराचे वृत्त कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारांवर देखील आंदोलकांनी राग काढत आहे. तर काही लोकांवर दगडफेक करण्यात आली. तसेच राज्य सरकारने मंदिरापासून २० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पंपा, निलक्कल, सन्नीधनम आणि इलावुंगल येथे हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
Kerala: Devotees climb the sacred Pathinettam Padi to enter the #SabarimalaTemple to offer prayers. pic.twitter.com/lGMLwxV1kL
— ANI (@ANI) October 17, 2018
#WATCH #Kerala: Police personnel vandalise vehicles parked in Pampa. Incidents of violence had broken out today in parts of the state over the entry of women of all age groups in #SabarimalaTemple. pic.twitter.com/xi3H4f5UUU
— ANI (@ANI) October 17, 2018
भगवान अयप्पांच्या मंदिरात कोणत्याही वयोगटतील महिलांना कोणताही भेदभाव न कराता प्रवेश द्यावा, असा आदेश २८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा हे मंदिर उघडणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.