तिरुवनंतपुरमन | शबरीमाला प्रकरण हे संघ आणि भाजपचे मोठे कारस्थान असल्याचा आरोप सीपीएमचे महासचिव सीताराम येच्युरी यांनी केला आहे. केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात विशिष्ट वयोगटातील महिलांच्या प्रवेश बंदीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. येच्युरी यांनी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाची तुलना बाबरी मशीद वादाशी केल्याने आता यावरून पुन्हा मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
All the TV crews who went there which had women were roughed up, the pattern is very similar to the time of the Babri Masjid demolition. You have the heads of the volunteers wearing saffron bands, the same dress you found there then: Sitaram Yechury, CPI(M) #SabarimalaTemple pic.twitter.com/tnJllNvdtB
— ANI (@ANI) October 19, 2018
शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून निर्माण झालेल्या या वादाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप या दोघांची फूस असल्याचा आरोप येच्युरी यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘शबरीमाला मंदिर हे काही पर्यटन स्थळ नाही, तिथे केवळ भक्तच जाऊ शकतात’, असे काँग्रेस नेते आर. चेन्निथला यांनी म्हटले आहे.
This is agenda driven. Police is also involved in it…This is not a place for sex tourism. This is the abode of lord Ayappa: Prayar Gopalakrishnan, former Travancore Devaswom Board President #SabarimalaTemple #Kerala pic.twitter.com/XiAJgRtRFf
— ANI (@ANI) October 19, 2018
केरळ येथील शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही गेले काही दिवस केरळमध्ये मोठे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. काल (गुरुवारी) केरळमध्ये जमाव बंदी लागू करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निषेधार्थ गुरुवारी शबरीमाला संरक्षत समिती आणि विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पुकारला होता. बंदामुळे बस आणि रिक्षा सेवा ठप्प झाल्या होत्या. पोलिसांच्या बंदोबस्तात मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या दोन महिलांना विरोधकांमुळे माघारी परतावे लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.