नवी दिल्ली | ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी (१९ जून) देशातील सर्वपक्षीय प्रमुखांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला देशातील राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांचे प्रमुख देखील उपस्थित राहतील. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या बैठकीला उपस्थित राहणार कि नाही याबाबत जरी अनिश्चितता असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू मात्र या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे.
NCP chief Sharad Pawar will attend the meeting called by Prime Minister Narendra Modi in the Parliament today. The PM will chair a meeting of heads of various political parties in both the Houses of Parliament. (file pic) pic.twitter.com/a6vcMmB21X
— ANI (@ANI) June 19, 2019
‘एक देश एक निवडणूक’ हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याच, विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली आहे. मात्र, अनेक विरोधी पक्षांनी ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना नाकारली आहे. मात्र, या बैठकीस उपस्थित राहण्यास काही पक्षांच्या प्रमुखांनी नकार दिला आहे तर काही पक्षप्रमुखांनी स्वतः उपस्थित न राहता आपला प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.