नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. कृषी विधेयकांमुळे लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपला रामराम केले आहे. जुना सहकारी शिरोमणी अकाली दल यांनी एनडीएतून काढता पाय घेतला आहे.
कृषी विधेयकावरून शिरोमणी अकाली दल आणि केंद्र सरकारमध्ये वादंग सुरू झाले होते. केंद्र सरकारने कृषी विधेयक, किमान हमी भावासंदर्भातील धोरणावर भूमिका न बदलल्याने शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Shiromani Akali Dal (SAD) has decided to pull out of BJP-led NDA alliance because of the centre’s stubborn refusal to give statutory legislative guarantees to protect assured marketing of farmers crops on MSP & its continued insensitivity to Punjabi & Sikh issues: SAD pic.twitter.com/lC3xHczDm2
— ANI (@ANI) September 26, 2020
नवे कृषी धोरण जाहीर झाल्यानंतरच अन्नप्रक्रीया मंत्रीपदावरून हरसिम्रत कौर यांनी राजीनामा दिला होता. आता शिरोमणी अकाली दल एनडीएतून वेगळे झाले आहे. अकाली दलने लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकांचा विरोध केला होता. भाजप आणि अकाली दल मागील २२ वर्षांपासून सोबत आहेत. त्यामुळे हा भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.