लखनऊ | महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधूंच्या हत्येपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील दोन साधुंची हत्येवरून आता राजकारण सुरू झाले आहे. या प्रकरणी शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांनी काल (२८ एप्रिल) या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदितयनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील, असे ट्वीट करत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला होता. यावर योगी आदित्यनाथ यांना ट्वीट करत सडेतोड उत्तर दिले आहे. पालघरमधील साधूंच्या हत्येवर चिंता व्यक्त करणाऱ्याला राजकारण म्हणाऱ्यानी त्यांची वैचारिक दृष्टी बद्दल काय बोलावे ?, यावरू तुमच्या राजकीय संस्काराचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हणत राऊतांना उत्तर दिले आहे.
बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या . मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची योगी अदितयनाथ यांच्याशी फोनवर चर्चा. साधु हत्ये बाबत चिंता वयकत केली. अशा अमानुष घटना घडतात तेव्हा राजकारण न करता आपण एकत्र काम करून गुन्हेगाराना शासन केले पाहिजे :ऊधदव ठाकरे
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 28, 2020
राऊतांचे कालचे ट्वीट, “अत्यंत निघृण आणि अमानुष! ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदितयनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील.” “बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या . मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची योगी अदितयनाथ यांच्याशी फोनवर चर्चा. साधु हत्ये बाबत चिंता वयकत केली. अशा अमानुष घटना घडतात तेव्हा राजकारण न करता आपण एकत्र काम करून गुन्हेगाराना शासन केले पाहिजे :ऊधदव ठाकरे,” असे दोन ट्वीट करत योगी आदित्यनाथवर राऊतांनी टीका केली.
अत्यंत निघृण आणि अमानुष!
ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे.
सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदितयनाथ हे गुन्हेगारांवर
कठोर कारवाई करतील.— Sanjay Raut (@rautsanjay61) April 28, 2020
राऊतांच्या टीकेला योगी आदित्यनाथ ट्वीटमध्ये लिहिले, पालघरमधील साधूंच्या हत्येवर चिंता व्यक्त करणाऱ्याला राजकारण म्हणाऱ्यानी त्यांची वैचारिक (कु) दृष्टी बद्दल काय बोलावे?, कुसंस्कारामध्ये ‘रक्त स्नान’ करणारी तुमची टिप्पणी, ही तुमची बदलली राजकीय संस्कारांचे परिचाय देत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात कायद्याचे राज आहे. कायदा तोडणाऱ्यावर कठोर कारवाई करणार आहे. बुलंदशहाती घटनेवर तात्काळ कारवाई करत, अवघ्या काही तासांत आरोपींना अटक करण्यात आली, महाराष्ट्र सांभाळा युपीची काळजी करू नका, असे ट्वीटमध्ये म्हणाले आहे.
CM श्री @myogiadityanath जी के नेतृत्व में उ.प्र. में काननू का राज है। यहाँ कानून तोड़ने वालों से सख्ती से निपटा जाता है।
बुलन्दशहर की घटना में त्वरित कार्रवाई हुई और चंद घंटों के भीतर ही आरोपी को गिरफ्तार किया गया।
महाराष्ट्र संभालें,यूपी की चिंता न करें।#योगी_हैं_तो_न्याय_है— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.