HW Marathi
देश / विदेश

पाकिस्तान काय किंवा चीन काय, दोघेही दुतोंडी साप !

मुंबई । दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही, असे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. सिंध प्रांतातील एका सभेत इम्रान यांनी ही ‘गर्जना’ केली. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही दहशतवाद संपविण्यासाठी आणि हिंदुस्थानसोबत निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान योग्य कार्यवाही करीत आहे असे म्हटले आहे. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना म्हणे त्यांनी तसे आश्वासन दिले आहे. इम्रान यांचा हा निर्धार प्रामाणिक आहे की जगाला दाखविण्यासाठी केलेला कांगावा हे भविष्यातच समजू शकेल. कारण पाकिस्तान काय किंवा चीन काय, दोघेही दुतोंडी साप आहेत. एका तोंडाने बोलायचे आणि दुसर्‍या तोंडाने डंख मारायचा हेच यांचे आजवरचे धंदे आहेत. भारताला याचा अनुभव मागील 50-60 वर्षांत पदोपदी आला आहे. त्यामुळे आताही इम्रान खान यांनी कितीही ग्वाही दिली असली, 182 मदरसे ताब्यात घेऊन पाकने बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित 100 दहशतवाद्यांना अटक केली असली तरी जैश-ए-मोहम्मद आणि तिचा म्होरक्या मसूद अजहरचे काय, हा प्रश्न अधांतरीच आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख यांनी सामनाच्या संपादकीयमधून पाकिस्तानवर टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय 

हिंदुस्थानद्वेष आणि दहशतवाद या पाकड्यांच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी गर्जना केली असली तरी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय ही त्यांची गुप्तचर संस्था या गर्जनेतील हवा काढून घेईल हे निश्चित आहे. कारण दहशतवादाला पोसणे हेच त्यांचे मुख्य अस्त्र आहे. तेव्हा दहशतवाद्यांना पाकिस्तानी जमीन वापरू देणार नाही ही इम्रान यांची घोषणा पोकळ आहे. किंबहुना संयुक्त राष्ट्रांत मसूद अजहरसंदर्भात बुधवारी होणारा फैसला आणि दहशतवादाबाबत पाकिस्तानवर असलेला आंतरराष्ट्रीय दबाव यामुळेच पाकड्यांच्या या अशा गर्जना आणि वल्गना सुरू आहेत.

दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही, असे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. सिंध प्रांतातील एका सभेत इम्रान यांनी ही ‘गर्जना’ केली. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही दहशतवाद संपविण्यासाठी आणि हिंदुस्थानसोबत निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान योग्य कार्यवाही करीत आहे असे म्हटले आहे. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना म्हणे त्यांनी तसे आश्वासन दिले आहे. इम्रान खान आणि कुरेशी यांनी हवेत सोडलेले हे बुडबुडे म्हणजे दहशतवादाच्या इंधनावर उंच उडणारे पाकिस्तानचे विमान तूर्त तरी जमिनीवर आल्याचे चिन्ह आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचा बदला म्हणून हिंदुस्थानी वायुदलाने ‘जैश-ए-मोहम्मद’च्या पाकव्याप्त कश्मीरमधील मुख्य प्रशिक्षण तळांवर एअर स्ट्राइक केला. त्यानंतर पाकिस्तानची सर्वच पातळ्यांवर कोंडी झाली आहे. दहशतवादावरून पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आहे. त्यामुळे जागतिक दहशतवादाचा पोशिंदा असलेला पाकिस्तान कधी नव्हे तो बचावाच्या भूमिकेत गेला आहे. सुरुवातीच्या काळात थोडी

खळखळ आणि फडफड

त्यांनी करून पाहिली, पण ती तेवढय़ापुरतीच मर्यादित राहिली. पाकिस्तानी एफ-16 विमान पाडणारे हिंदुस्थानी विंग कमांडर अभिनंदन यांनाही पाकिस्तानला लगेच हिंदुस्थानला सुपूर्द करावे लागले. त्यानंतर ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरच्या कथित मृत्यूच्या बातम्या आल्या. त्याचे नंतर पाकिस्तानने खंडन केले. त्यापाठोपाठ मसूद अजहरच्या भावासह ‘जैश’च्या शंभरावर दहशतवाद्यांच्या अटका-सटका केल्या गेल्या. आता तर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान याला देशाबाहेर हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानी जमिनीचा वापर करू देणार नाही, असे जाहीरपणे सांगावे लागले आहे. अर्थात इम्रान यांचा हा निर्धार प्रामाणिक आहे की जगाला दाखविण्यासाठी केलेला कांगावा हे भविष्यातच समजू शकेल. कारण पाकिस्तान काय किंवा चीन काय, दोघेही दुतोंडी साप आहेत. एका तोंडाने बोलायचे आणि दुसर्‍या तोंडाने डंख मारायचा हेच यांचे आजवरचे धंदे आहेत. हिंदुस्थानला याचा अनुभव मागील 50-60 वर्षांत पदोपदी आला आहे. त्यामुळे आताही इम्रान खान यांनी कितीही ग्वाही दिली असली, 182 मदरसे ताब्यात घेऊन पाकने बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित 100 दहशतवाद्यांना अटक केली असली तरी जैश-ए-मोहम्मद आणि तिचा म्होरक्या मसूद अजहरचे काय, हा

प्रश्न अधांतरीच

आहे. त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री हाताची घडी तोंडावर बोट ठेवून सोयिस्कर मौन बाळगून आहेत. खरे म्हणजे अशा चिल्लर कारवाया करण्यापेक्षा थेट मसूद अजहरला अटक करून ‘जैश-ए-मोहम्मद’वर बंदीची कुर्‍हाड चालवली असती तर इम्रान यांना पाकपुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे खरोखर मोडायचे आहे याची खात्री जगाला पटली असती, दहशतवाद्यांना पाकिस्तानी जमिनीचा वापर करू देणार नाही, या त्यांच्या दाव्यात तथ्य वाटले असते. हिंदुस्थानद्वेष आणि दहशतवाद या पाकड्यांच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी गर्जना केली असली तरी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय ही त्यांची गुप्तचर संस्था या गर्जनेतील हवा काढून घेईल हे निश्चित आहे. कारण दहशतवादाला पोसणे हेच त्यांचे मुख्य अस्त्र आहे. तेव्हा दहशतवाद्यांना पाकिस्तानी जमीन वापरू देणार नाही ही इम्रान यांची घोषणा पोकळ आहे. किंबहुना संयुक्त राष्ट्रांत मसूद अजहरसंदर्भात बुधवारी होणारा फैसला आणि दहशतवादाबाबत पाकिस्तानवर असलेला आंतरराष्ट्रीय दबाव यामुळेच पाकड्यांच्या या अशा गर्जना आणि वल्गना सुरू आहेत.

Related posts

जैश-ए-मोहम्‍मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्‍वीकारलेली नाही !

News Desk

भारतीय सैन्याच्या गोळीबारात पाकिस्तानचे ३ पेक्षा अधिक जवान ठार तर १ जखमी

News Desk

पंतप्रधान मोदी द्वेषाचे विष पेरतात, राहुल गांधींची जहरी टीका

News Desk