HW Marathi
देश / विदेश राजकारण

शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील !

मुंबई । भारताने हवाई दलाने गेल्या महिन्यात ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ करून जो तडाखा दिला त्यामुळे पाकिस्तानचे नाक ठेचले गेले. त्यांच्याकडून सध्या सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणजे ते ठेचलेले नाक पुन्हा वर काढण्याचा आणि ‘गिरे तो भी टांग उपर’ दाखविण्याचाच आटापिटा आहे. आपले सैन्य त्याला ‘मूंहतोड जवाब’ देतच आहे, पण तरीही पाकडय़ांची वळवळ थांबलेली नाही. पाकिस्तानला भारतानने हवाई हल्ल्याचा तडाखा दिल्यानंतरही त्यांच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. मंगळवारी आपल्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यात त्यांचे तीन सैनिक मारले गेले. याआधीही आपल्या सैन्याने आणि सीमा सुरक्षा दलाने पाकडय़ांच्या शस्त्रसंधीला चोख प्रत्युत्तर दिलेच आहे, अशा शब्दात सामनाच्या संपदकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर तोफ डागली.

सामनाचे आजचे संपादकीय

हिंदुस्थानी हवाई दलाने गेल्या महिन्यात ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ करून जो तडाखा दिला त्यामुळे पाकिस्तानचे नाक ठेचले गेले. त्यांच्याकडून सध्या सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणजे ते ठेचलेले नाक पुन्हा वर काढण्याचा आणि ‘गिरे तो भी टांग उपर’ दाखविण्याचाच आटापिटा आहे. आपले सैन्य त्याला ‘मूंहतोड जवाब’ देतच आहे, पण तरीही पाकडय़ांची वळवळ थांबलेली नाही. हे शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील.

पाकिस्तानला हिंदुस्थानने हवाई हल्ल्याचा तडाखा दिल्यानंतरही त्यांच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. मंगळवारी आपल्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यात त्यांचे तीन सैनिक मारले गेले. याआधीही आपल्या सैन्याने आणि सीमा सुरक्षा दलाने पाकडय़ांच्या शस्त्रसंधीला चोख प्रत्युत्तर दिलेच आहे. तरीही सीमेपलीकडून त्यांचा गोळीबार सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच गोळीबारात आपल्या एका सुरक्षा जवानाचा आणि एक महिला व लहान मुलीचा मृत्यू झाला. पाकडय़ांच्या या गोळीबारात नेहमीच आपल्या सीमा भागातील निरपराध्यांचा बळी जात असतो. त्यांच्या घरांचे, जनावरांचे, इतर मालमत्तेचे नुकसान होत असते. वर्षानुवर्षे हे सुरू आहे. म्हणजे एकीकडे हिंदुस्थानकडून शांततेची अपेक्षा करायची, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान कसा प्रयत्न करीत आहे याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे शस्त्रसंधीचे सर्रास उल्लंघन करीत सीमेपलीकडून गोळीबार सुरूच ठेवायचा. एवढेच नव्हे तर लढाऊ विमानाद्वारे हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचा. दहशतवाद्यांच्या हिंदुस्थानातील घुसखोरीला सर्व प्रकारचे सहकार्य, सहाय्य आणि प्रोत्साहन देण्याचा उद्योग पाकिस्तानने बंद केलेला नाही. त्यात

सीमेपलीकडून गोळीबार

आणि प्रसंगी तोफांचा भडीमार करायचा. पुलवामा हल्ला झाल्यानंतर आपल्या हवाई दलाने ‘बालाकोट एअर स्ट्राइक’चा तडाखा दिल्यानंतर तरी हडबडलेला पाकिस्तान भानावर येईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचे शेपूट वाकडेच राहिले आहे. अर्थात पाकिस्तान काय किंवा त्याला मांडीवर घेणारा चीन काय, या दोघांचे शेपूट हिंदुस्थानसंदर्भात सरळ होण्याची शक्यता नाहीच. म्हणूनच या दोन्ही देशांकडून घुसखोरीचे प्रयत्न नेहमीच होत आले आहेत. तूर्त चिन्यांच्या उडय़ा थांबलेल्या दिसत असल्या तरी पाकडय़ांची वळवळ सुरूच आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही, हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान योग्य कार्यवाही करीत आहे अशा वल्गना मध्यंतरी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्या. तसे म्हणे त्यांनी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना सांगितले. मात्र हा पाकिस्तानचा नेहमीचाच देखावा आणि कांगावा आहे हे त्या देशाकडून रोज हिंदुस्थानी सीमेवर होणाऱया गोळीबाराच्या घटनांवरून दिसून येत आहे. पाकिस्तान हा दुतोंडी साप आहे. आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या आगळीकीला सडेतोड उत्तर देतो. पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त करतो, पण तरीही पाकिस्तानच्या

कारवाया

थांबत नाहीत. गेल्या काही दिवसांत पूंछ, नौशेरा, राजौरी, शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्य सातत्याने गोळीबार आणि तोफांचा मारा करीत आहे. त्याला उत्तर म्हणून आपणही पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या. तरीही मंगळवारी रात्री पाकडय़ांनी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेच. हिंदुस्थान विरोधातील कुरापती हा पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर यांचा ‘श्वास’ आहे. त्याशिवाय ते राहूच शकत नाहीत. त्यामुळेच हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले घडवून आणणे, कश्मीर खोरे सतत अशांत ठेवणे, त्या ठिकाणी हिंदुस्थानविरोधी वातावरण कायम ठेवणे, कश्मिरी तरुण-तरुणीच्या मनात हिंदुस्थानद्वेषाचे आणि ‘स्वतंत्र कश्मीर’चे जहर भिनवणे, सीमेपलीकडून गोळीबार करणे असे त्यांचे उद्योग सुरूच असतात. हिंदुस्थानी हवाई दलाने गेल्या महिन्यात ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ करून जो तडाखा दिला त्यामुळे पाकिस्तानचे नाक ठेचले गेले. त्यांच्याकडून सध्या सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणजे ते ठेचलेले नाक पुन्हा वर काढण्याचा आणि ‘गिरे तो भी टांग उपर’ दाखविण्याचाच आटापिटा आहे. आपले सैन्य त्याला ‘मूंहतोड जवाब’ देतच आहे, पण तरीही पाकडय़ांची वळवळ थांबलेली नाही. हे शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील.

Related posts

कैद्यांना भेटायला आलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर मारले शिक्के

News Desk

सुषमा स्वराज खोटारड्या आहेत, चीनचा आरोप

News Desk

किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला ते पाकिस्तानात स्वतः जाऊन शोधा !

News Desk