HW News Marathi
देश / विदेश

कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | आज देशामध्ये 67व्या राष्‍ट्रीय फिल्‍म पुरस्‍कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा आणि चर्चेतला पुरस्कार मिळाला आहे अभिनेत्री कंगणा राणावतला. कंगणाला तिच्या ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आज मिळाला आहे.या पुरस्काराची ती चौथ्यांदा मानकरी ठरली आहे.

कंगणा राणावतला याआधी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.तिच्या फॅशन,तन्नु विड्स मनु आणि क्वीन चित्रपटांसाठा तिला पुरस्कार मिळालेला आहे.आता तिला पंगा आणि मणिकर्णिका साठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कंगना आणि वाद

कंगणा राणावत ही अभिनेत्री गेल्या अनेक दिवसांपासुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे.सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तिने अनेक आरोप केले त्यानतंर तिच्या ॲाफिसवर बीएमसीकडुन कारवाई करण्यात आलेली होती,हा विषय संपुर्ण देशात चर्चेचा विषय बनला होता.कंगणा राणावत ही भाजपच्या बाजूने बोलत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्त गुजरातसाठी पाचशे कोटींची मदत

News Desk

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवट दिवस

News Desk

शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे !

swarit