HW News Marathi
देश / विदेश

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची कामगिरी असमाधानकारक

पाटणा | बिहार विधानसभा निवडणूकीचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप-जेडीयू यांची एनडीए बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. २३ पैकी २१ जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती.

मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना ०.०४ टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी १.४५ वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला २३ पैकी २१ जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने ५० उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात २३ जागांवरच निवडणूक लढवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुकचा सर्वेसर्वा झाला दुसऱ्यांदा झाला बाप.. मुलींला पत्रातून दिल्या शुभेच्छा

News Desk

पद्मनाभस्वामी मंदिराचं व्यवस्थापन आता राजघराण्याकडे

News Desk

४८ तासांसाठी इंटरनेट सेवा राहणार बंद ?

News Desk