HW News Marathi
देश / विदेश

शिवसेनेचा ‘परळ ब्रॅंड’ मोहन रावल यांचे निधन

मुंबई | ‘बाळासाहेबांचा शिवसैनिक’ अशी ओळख असणारे शिवसेना नेते माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झाले आहे. ते 72 वर्षांचे होते,ते काही कामानिमित्त गोव्यात गेले असताना त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दरम्यान त्यांच्या निधनाने शिवसेनेतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.आज संध्याकाळी मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आणले जाईल. यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मोहन रावल हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून ते तब्बल पाचवेळा लोकसभेत निवडून गेले होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लालबाग-परळ भागात जे शिवसैनिक निर्माण केले, त्यातील पहिल्या फळीचे शिवसैनिक म्हणून मोहन रावले सर्वांना परिचित होते.

मोहन रावले यांना आदरांजली अर्पण करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाचवेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करावे तसे भरावे !, ED च्या कारवाईनंतर नारायण राणेंनी हाणला टोला

News Desk

लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे

News Desk

‘विरोधी पक्ष नेते दिल्लीत जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका’, राऊतांचा फडणवीसांना टोला  

News Desk