नवी दिल्ली | छत्तीसगढमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केलेल्या अजित जोगींसोबत एकत्र येण्याचा निर्णय बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी घेतला आहे. मध्य प्रदेशातही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुकांच्या आधीच देशातील काही राज्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपवर मात करण्यासाठी महाआघाडीचे स्वप्न बघणाऱ्या काँग्रेसला बसपा अध्यक्ष मायावतींनी एक मोठा धक्का दिला आहे.
Bahujan Samaj Party(BSP) has decided to contest upcoming assembly polls in alliance with Janta Congress Chhattisgarh. BSP will fight on 35 seats&Janta Congress Chhattisgarh will contest on 55 seats.If we win, Ajit Jogi will be the CM: BSP Chief Mayawati on #Chhattisgarh elections pic.twitter.com/pnW0APhAUL
— ANI (@ANI) September 20, 2018
BJP has been in power in Chhattisgarh for past 15 years. Satta ka durupyog, paise ka durupyog, prashasnik tantra ka durupoyog karke woh phir se satta mein aana chahti hai. Ab humara gathbandhan ho gaya hai, Mayawati ji aur humlog mil kar unko(BJP) avashya rok lenge: Ajit Jogi pic.twitter.com/gGPIShNbCi
— ANI (@ANI) September 20, 2018
बसपाच्या या निर्णयामुळे काँग्रेस कमकुवत होणार असून त्यामुळेच याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या फायदा हा भाजपला होणार आहे. आगामी लोकसभेसाठीची काँग्रेसची महाआघाडीची समीकरणे बिघडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत बसपा महाआघाडीत असेल कि नाही यावरही प्रश्नचिन्ह शंका उपस्थित केली जात आहे. ‘बसपाला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर महाआघाडीत सामील होणार नाही’, असे मायावतींनी आधीच स्पष्ट केले होते.
काँग्रेसला मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये देखील मायावतींच्या या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्ये वर्षाच्या शेवटी विधानसभेच्या निवडणुका होतील. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजप सत्तेत असल्याने भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस बसपसोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, मायावतींच्या या निर्णयाने काँग्रेसची कोंडी झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.