HW Marathi
देश / विदेश

धक्कादायक ! सुरक्षा दलाच्या धान्यसाठ्यात विष कालवून घातपात करण्याचा पाकिस्तानचा कट ?

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून भारत-पाकिस्तानचे संबंध प्रचंड ताणले गेलेले असताना आता एक अत्यंत धक्कादायक बाब समोर येत आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयने (द इंटर -सर्व्हिसेस इंटेलिजेन्स) रचलेला एक मोठा समोर आला आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या धान्यसाठ्यात विष कालवून मोठा घातपात करण्याचा कट पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून करण्यात आल्याचे, म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि आयएसआय हा कटामध्ये काश्मीरमधील एजंट्सची मदत घेऊ शकतात, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशातील अनेक मोठी शहरे आणि महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांचे लक्ष्य आहेत. तर राजधानी दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आहे. एकीकडे शांततेची भाषा करणारा पाकिस्तान त्याचवेळी दुसऱ्या बाजूला एक अत्यंत मोठा घातपात घडविण्याचा कट आखत होता, हे अत्यंत धक्कादायक आहे.

Related posts

अडीचशे वर्ष जगलेल्या माणसाची कथा

News Desk

दहशतवाद्यांचा वृत्तवाहिनीवर हल्ला

News Desk

राफेल डीलसाठी मोदी सरकारकडूनच रिलायन्सची निवड | फ्रान्स्वा ओलांद

अपर्णा गोतपागर