HW News Marathi
देश / विदेश

स्वयंघोषित बाबा श्री श्री रविशंकर यांच्याकडून तरुणीवर बलात्कार

मडगाव (गोवा) बालत्कार प्रकरणी राम रहिम बाबाचे किस्से सध्या गाजत असतानाच गोव्यातील स्वताला गुरुजी श्री श्री रविशंकर असे नाव धारण केलेल्या स्वघोषित बाबा वास्कोतील एका १९ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्को पोलिसांनी या बाबासह त्याचे साथीदार संतोषकुमार व निखिल उर्फ बंटी चव्हाण या तिघांवर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. सध्या तिघेही फरार आहेत.

सदर बाबाचे नाव आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्याशी साधर्म्य दाखविणारे असले तरी हा बाबा वेगळा असून कुंदापूर — कर्नाटक येथे त्याने आपला आश्रम थाटला होता. सदर पिडित मुलगी काहीशा विवंचनेत असल्याने बंटी चव्हाण याने हा बाबा तुझ्या अडचणी दूर करेल असे सांगून या बाबाच्या सान्निध्यात आणले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही बलात्काराची घटना चतुर्थीच्या काळात २३ ऑगस्टच्या दरम्यान घडली होती. निपाणी – कर्नाटक येथे संतोषकुमार याने या युवतीला आजरा येथील तिच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीतून लिफ्ट दिली होती. दरम्यान तिला काहीतरी औषध मिसळलेले पेय पिण्यास दिल्यानंतर तिला म्हापसा येथील एका अज्ञात स्थळी असलेल्या घरात नेण्यात आले. तिथे बाबा व बंटी चव्हाण होते. त्या दोघांनीही तिला त्या बाबापाशी सोडून ते मागे परतले. त्यानंतर त्या बाबाने तिच्यावर बलात्करा केला आणि याची वाच्यता केल्यास जिवंत मारण्याची धमकी दिली असे तक्रार पीडिताने दिली आहे.सध्या याप्रकऱणी पोलिस तपास करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

News Desk

भारतीय वंशाचा १२ वर्षीय मुलगा ठरला लंडनमध्ये ‘जिनिअस’

News Desk

मराठा मोर्चाला पाकिस्तानातूनही पाठिंबा

News Desk