HW News Marathi
देश / विदेश

महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे राज्यभर बंदची हाक

कोची | शबरीमला मंदिर प्रवेशावरुन गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाले आहेत. बुधवारी दोन महिलांनी पहाटेच्या सुमारास प्रवेश केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. महिलांच्या या प्रवेशाला क्रांतीकारी पाऊल ठरविण्यात आले आहे. परंतु, स्थानिक नागरिक आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी मात्र याचा कडाडून विरोध केला आहे. युनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंटकडून आज राज्यात काळा दिवस साजरा करण्यात येत असून केरळ बंदची हाक देण्यात आली आहे.

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शबरीमला मंदिरात बुधवारी ४० वर्षे वयाच्या दोन महिलांनी प्रवेश केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथे महिलांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे ४० वर्षांपासूनची परंपरा खंडीत झाली आहे. या २ महिलांनी मंदिरात प्रवेश करुन इतिहास रचला आहे. बिंदु आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे आहेत. मात्र या प्रवेशानंतर स्थानिकांनी मात्र या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग शुद्राला शुद्र म्हटले तर वाईट का वाटते ?”, प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा बरळल्या

News Desk

हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही !

News Desk

या हवाई हल्ल्याच्या वेळी आपल्याकडे राफेल असते तर…!

News Desk