HW Marathi
क्रीडा देश / विदेश

कठुआ सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरण : पठाणकोट न्यायालयाने ७ पैकी ६ आरोपींना ठरविले दोषी

पंजाब | देशाला हादरून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोट न्यायालयाने  ७ पैकी ६ आरोपीं दोषी ठरविण्यात आले आहे. तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी आज (१० जून) पठाणकोट न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. गेल्या १७ महिन्यांपासून या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागेल होते.  सांझी राम, आनंद दत्ता, दीपक खजूरिया, विशाल,  सुरेंदर वर्मा आणि तिलक राज या सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी दुपारी २ वाजता आरोपींना शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे पठाणकोट न्यायालया बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आहे. या प्रकरणाची ३ जून रोजी  सुनावणी पार पडली.

https://twitter.com/ANI/status/1137966997046792193

Related posts

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर नाराज

News Desk

कर्नाटक विधानसभेत बीएस येडियुरप्पा यांनी सिद्ध केले बहुमत

News Desk

आता बेटांचे ही नामांतर

News Desk