नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, आता अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधींसह काँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.
लोकसभेनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव सुपूर्द केला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी राहुल यांचा हा प्रस्ताव एकमताने नामंजूर केला होता. त्यानंतरही राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले. त्याचप्रमाणे नवा काँग्रेस अध्यक्ष हा गांधी घराण्यातील असू नये असा राहुल गांधी यांचा आग्रह होता.मात्र, आता राहुल गांधी यांचा राजीनामा मंजूर करून तूर्तास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.