HW News Marathi
देश / विदेश

सोनिया गांधी यांची रुग्णालयातून सुटका

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या शिमला या ठिकाणी सुट्टीसाठी गेल्या होत्या मात्र त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. ज्यानंतर सोनिया गांधींना तातडीने दिल्लीत आणले गेले. दिल्लीत त्यांना सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आज त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. तसेच त्यांना काही दिवस आराम करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.ह्णएएनआयह्ण या वृत्तसंस्थेने या संदर्भातला ट्विट केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तृप्ती देसाई यांना आयप्पा मंदिरात पोहचण्यापूर्वीच रोखले

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा

News Desk

चीनला भिडण्यासाठी नौदलाची नवी पाणबुडी

News Desk