HW News Marathi
देश / विदेश

प्रसिध्द पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

चेन्नई | प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती खालावली होती.बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराअंती त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मुलाने याबद्दल माहिती दिली आहे.

 

सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यांमुळे त्यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल ४० हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी ९ ते रात्री ९ या १२ तासांत तब्बल २१ गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी १६ गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना शशी थरुर म्हणाले…

Darrell Miranda

देशातील पारशी लोकसंख्येत घट; केंद्र सरकारची माहिती

News Desk

प. बंगालमध्ये निवडणुकीत हिंसाचार, भाजप उमेदवारावर हल्ला तर माध्यमांच्याही फोडल्या गाड्या 

swarit