HW News Marathi
देश / विदेश

साध्वी प्रज्ञाला आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई | भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आठवड्यातून एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने आज (३ जून) हजर राहण्याचे आदेश दिले आहे. संसदेच्या काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ३ ते ७ जूनपर्यंत न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी साध्वीने केलेल्या अर्जावर आज (३ जून) एनआयए न्यायालयाने फेटाळली आहे.

न्यायालयाने मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी जामीन दिला आहे. परंतु अद्याप दोषमुक्त करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळमधून काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांच्या विरोधात निवडणूक जिंकली. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास १०० जण जखमी झाले होते. मालेगावात एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणे आणि कट रचल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदुळाचे वाटप सुरू !

News Desk

एकीकडे कोरोनाचे सावट, तर दुसरीकडे देशभरात पावसाची शक्यता

swarit

आमचे मित्र चुकले आणि दिल्लीला गेले – अशोक गेहलोत

News Desk