लॉस एंजेलिस | जगप्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक स्टेन ली यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क यांच्यासारख्या सुपरहिरोंच्या पात्रांची निर्मिती केली आहे. स्टेन ली यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा अशी ली यांची ओळख होती.
Stan Lee, the co-creator of Marvel comics, passed away at the age of 95 in Los Angeles
Read @ANI Story | https://t.co/qBWBeMI9mj pic.twitter.com/f10NNDeLCW
— ANI Digital (@ani_digital) November 12, 2018
स्टेन ली यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलीने दिली. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ली यांचा जन्म २८ डिसेंबर १९२२ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. १९६१ मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले. त्यानंतर यामध्ये स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर् मॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला. स्टेन ली काही हॉलीवूड चित्रपटांमध्येदेखील दिसले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.