HW News Marathi
Covid-19

Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल!

हैदराबाद | आजपासून (१ मे ) देशभरात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. देशातील काही राज्यांत लसीचा तुटवडा जाणवत असताना भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. रशियात तयार झालेल्या Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल झाली आहे. हैदराबादमध्ये ही लस आलेली आहे.

Sputnik V ने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीला आपल्याला हरवायचं आहे आणि आपण सर्वजण एकत्र येऊन ही गोष्ट नक्कीच करु शकतो असं Sputnik V ने म्हटलं आहे. भारतात एकूण सहा टप्प्यांमध्ये ही लस आणली जाणार असून पहिला टप्पा मे महिन्यात आलेला आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस नागरिकांना दिली जात आहे.

 

या लसीची किंमत भारतात काय असेल हे विचारलं तेव्हा डॉ रेड्डीजचे सीइओ दीपक सप्रा म्हणाले की ‘रशियाकडून आयात होणाऱ्या लसीच्या किंमतीत आणि भारतात तयार होणाऱ्या लसींच्या किंमतीत फरक असेल. आम्ही त्यावर विचार करतो आहोत. स्पुटनिक व्ही ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचंही सप्रा यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता

News Desk

‘या’ कारणामुळे पियुष गोयल चिडले मुख्यमंत्र्यांवर

News Desk

साताऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत गृहराज्यमंत्री आणि पत्रकारांत खडाजंगी

News Desk