कोलंबो | श्रीलंकेत आज दिवसभरात ८७ बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील चर्चमध्ये बॉम्बनिकामी करताना बॉम्बस्फोट झाला आहे. श्रीलंकेत आज (२२ एप्रिल) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू होणार आहे. श्रीलंकेत रविवारी (२१ एप्रिल) ईस्टर संडेच्या दिवशी ८ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याने जगभरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर देशात भिती आणि दहशतीचे वातावरण आहे. श्रीलंकेची सध्याची परिस्थिती पाहता, राष्ट्रपीत मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.
Reuters: An explosion went off in a van near a church in Colombo, #SriLanka when bomb squad officials were trying to defuse it. pic.twitter.com/eBpIUKk7Pt
— ANI (@ANI) April 22, 2019
श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोटघडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात २९० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. मृतांमध्ये ३५ हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले. रविवारी सकाळी ८.४५ वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची झाली आहे.
Reuters: Sri Lankan President Maithripala Sirisena to declare nationwide emergency from midnight on Monday following Easter Day blasts pic.twitter.com/41qoYo1HqU
— ANI (@ANI) April 22, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.