HW News Marathi
देश / विदेश

विरोधात पोस्ट केल्याने आव्हाडांच्या लोकांकडून जबर मारहाण, तरुणाचा गंभीर आरोप

मुंबई | देशात सध्या ‘कोरोना’चे संकट आहे. आपण सर्वजच जण एकत्रितरित्या ही लढाई आहोत. मात्र, आता दुसरीकडे राजकारणही तापू लागले आहे. ठाण्यातील एका सिव्हिल इंजिनिअर तरुणाने राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. “जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोस्ट टाकल्याने त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आपल्या बंगल्यावर नेऊन आव्हाडांसमोरच अमानुष मारहाण केली”, असा गंभीर आरोप करत याविरोधात या तरुणाने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या महिनानुसार, काहीच दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींच्या ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे लावण्याच्या आवाहनावर टीका केली होती. आव्हाडांनी त्याबद्दलचा पोस्ट आणि व्हिडीओ देखील आपल्या ट्विटर हँडलवर टाकला होता. आव्हाडांनी पंतप्रधानांवर केलेल्या या टीकेनंतर संबंधित तरुणाने आव्हाडांच्या विरोधात एक पोस्ट टाकली. त्यामुळे, आव्हाडांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या समोरच संबंधित तरुणाला जबर मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. मारहाणीनंतर आव्हाडांनी आपल्याला पोस्ट का टाकली ? असे देखील विचारले. तर आपण अतिउत्साहात आणि भावनेच्या भरात पोस्ट टाकल्याचे म्हणत त्या तरुणाने माफी मागितली. त्याचप्रमाणे, आपल्या बायकोला ती पोस्ट देखील डिलीट करायला सांगितले

संबंधित तरुण काय म्हणतो ?

“५ एप्रिलच्या रात्री ११:३० च्या जवळपास साध्या वेशातील पोलीस त्या तरुणाच्या घरी गेले. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावे लागेल असे म्हणून पोलीस त्या तरुणाला नेऊ लागले. त्यावेळी त्या संबंधित तरुणाच्या पत्नीने कारण विचारले असता “चौकशी करून १० मिनिटांत आणून सोडतो” असे सांगून ते तरुणाला पांढऱ्या रंगाच्या स्क्रॉपिओ गाडीने घेऊन गेले. त्या तरुणाचा फोन हिसकावून घेत आव्हाडांच्या नाथ बंगल्यावर घेऊन गेले. त्यावेळी जितेंद्र आव्हाडसुद्धा तिथे हजर होते. तिथे आधीच उपस्थित १५-२० जणांनी या तरुणाला पोलिसांच्या काठीने जबर मारहाण केली. तसेच त्यानंतर लाकडी आणि लोखंडी पाईपने देखील भोवळ येईपर्यंत मारले”, असा गंभीर आरोप या तरुणाने केला आहे.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाला नेमकं काय लपवायचंय ?”, राज ठाकरेंचा संतप्त सवाल

News Desk

तामिळनाडू निवडणुकीपूर्वी शशिकला यांची राजकारण सोडल्याची मोठी घोषणा

News Desk

“अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरांचीही CBI चौकशी करा”

News Desk