HW News Marathi
देश / विदेश

गोव्यात आजपासून सुरू होणार बारावीची परीक्षा

पणजी | गोव्यात बारावीची परीक्षा आजपासून (२८ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसायिक शाखेतील मिळून १७८८६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. ही परीक्षा २८ फेब्रुवारी ते २६ मार्च काळा दरम्यान असणार आहे. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार कला शाखेतून ४३३२, वाणिज्य शाखेत ५३४४, विज्ञान शाखेत ५२६५ तर व्यावसायिक शाखेत २९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एक़ूण ८५७४ मुलगे आणि ९३१२ मुली आहेत. कला शाखेत जास्त मुली आहेत.

परीक्षेच्या पहिल्या दिवशी आज सकाळी १० ते दु. १२.३0 अकौंटंसी, फिजिक्स, इतिहासचा पेपर असणार आहे. १ मार्चला सकाळी १० ते १ इंग्रजी, मराठी, ६ मार्चला सकाळी १० ते १२.३० केमिस्ट्री, बिझनेस स्टडी, ८ मार्च-सकाळी १० ते १२.३० इकोनोमिक्स, ११ मार्च- सकाळी १० ते १२.३० – जीवशास्र (बायोलॉजी), भूगर्भशास्र (जिओलॉजी), १३ मार्च-सकाळी १० ते १२.३० गणित, पॉलिटिकल सायन्स, १५ मार्च-सकाळी १० ते १२.३० सायकॉलॉजी, कूकरी, १६ मार्च-सकाळी १० ते १२.३० हिंदी व्दितीय भाषा, पोर्तुगीज १८ मार्च-सकाळी १० ते १२.३० बँकिंग. २६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 मराठी व्दितीय भाषा, फ्रेंच या विषयाच्या परीक्षा होतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा ११ वा अवतार !

News Desk

केदारनाथमध्ये औरंगाबादच्या भाविकांचा अपघात, दोन ठार 33 जखमी

News Desk

पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण

News Desk