नवी दिल्ली | कर्नाटकातील राजकीय परिस्थिती सावरण्यासाठी मुख्ममंत्री एच. डी. कुमारस्वामी सर्व प्रकारचा प्रयत्न करत आहेत. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे डी. के. शिवकुमार यांनी बांधकाम मंत्री एम. टी. बी नागराज यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली आहे.
DK Shivakumar, Congress: We should live together and die together because we have worked for 40 years for the party, there are ups and downs in every family. We should forget everything and move forward. Happy that MTB Nagaraj(rebel MLA) has assured us he will stay with us pic.twitter.com/hTd2L4rO2J
— ANI (@ANI) July 13, 2019
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि जल संसाधन मंत्री डी. के. शिवकुमार आज (१३ जुलै) पहाटे ५ वाजता नागराज यांच्या घरी पोहोचले. त्यांनी जवळपास पाच तास त्यांच्याशी बातचीत केली. शिवकुमार यांनी नागराज यांची नाराजी दूर करून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. या बैठकीनंतर नागराज काँग्रेससोबतच राहणार असल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली. तर दुसरीकडे रामलिंग रेड्डी, मुणीरत्ना आणि आर. रोशन बेग यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मी राजीनामा द्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता शिवकुमार आणि इतर काँग्रेस नेत्यांनी मला राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला, असे नागराज यांनी सांगितले. चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यावर आता सोबतच राहायला हवे आणि सोबतच मरायला हवे, असे शिवकुमार म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.