HW News Marathi
देश / विदेश

कमांडर अभिलाष यांना सुखरूपपणे वाचविण्यात यश

मुंबई | भारतीय नौसेनेतील जवान आणि गोल्डन ग्लोब रेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे कमांडर अभिलाष टॉमी यांना सुखरूपपणे वाचविण्यात अखेर यश आले आहे. गोल्डन ग्लोब रेस स्पर्धेत अभिलाष हे दक्षिण हिंदी महासागरात वादळी वाऱ्यामुळे जखमी झाले होते. अभिलाष यांना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाची आएनएस सातपुडा आणि ऑस्ट्रेलियन नौदल यांनी संयुक्त मोहीम राबविली होती.

अभिलाष यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी आपण जखमी असल्याचे सांगून स्ट्रेचरची मागणी केली होती. गोल्डन ग्लोब रेस नौकायन स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील नावाजलेले नौकायनपटू भाग घेतात. यावर्षी फ्रान्स मधून 1 जुलैपासून ही स्पर्धा सुरु झाली. अभिलाष यांच्या सुटकेसाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येत होती.

गोल्डन ग्लोब रेस स्पर्धेतून अभिलाष यांनी न थांबता जगाला प्रदक्षिणा घातली आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी त्यांना विशेष प्रतिनीधी म्हणून आमंत्रित केले गेले होते. अभिलाष हे मुळचे मुंबईचे आहेत. गेल्या तब्बल १८ वर्षापासून नौदलामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून त्यांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले आहे.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले समाधान व्यक्त

अभिलाष यांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले म्हणून समाधान व्यक्त केले आहे. तसेच अभिलाष यांना आयएनएसमधून मॉरिशियसमध्ये उपचारासाठी आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर प्राथमिक व गरजेनुसार उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून दिली आहे.

Related posts

२०१९मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू, डब्ल्यूपीसीआयचा रिपोर्ट

News Desk

दहशतवाद्यांचा वृत्तवाहिनीवर हल्ला

News Desk

कृषी कायद्यांचं भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयात! समितीने बंद लिफाफ्यात अहवाल केला सादर

News Desk