नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या काळात एकीकडे आर्थिक संकट असले तरी काही स्तरांतून गुंतवणूक भारतात केली जात आहे. अशातच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. या पुढे ५ ते ७ वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचाई यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुंदर पिचाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.
“आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असे ट्विट पिचाई यांनी केले आहे.
Today at #GoogleForIndia we announced a new $10B digitization fund to help accelerate India’s digital economy. We’re proud to support PM @narendramodi’s vision for Digital India – many thanks to Minister @rsprasad & Minister @DrRPNishank for joining us. https://t.co/H0EUFYSD1q
— Sundar Pichai (@sundarpichai) July 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.