नवी दिल्ली। नागरिकत्वा सुधारणा कायदा (सीएए)व राष्ट्रीय नागरिकत्वा नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. दिल्लीमध्ये रविवारी(२३ फेब्रुवारी) पासून आंदोलनात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा बळी घेतला आहे. तर १८९ हून अधिक दिल्लीकर जखमी झाले. यात ५६ पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. दिल्लीत जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. तर भजनपुरा आणि खजुरी खसमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाल्याने पोलिसांनी या भागात संचलन केले.
Sunil Kumar Gautam Medical Superintendent, Guru Teg Bahadur (GTB) Hospital: Out of all the people that were brought to the hospital 189 are injured and 20 are dead. #DelhiViolence pic.twitter.com/U8dlp4nrZV
— ANI (@ANI) February 26, 2020
दिल्लीतील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांना सीआरपीएफमधून माघारी बोलावून दिल्लीचेविशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) म्हणून तत्काळ नियुक्त केले. दिल्ली पोलिसांनी रात्रीपर्यंत ११ एफआयआर दाखल करतवीसहून अधिक लोकांना अटक केली आहे.
गृृहमंत्र्यांनी दिल्ली दिल्लीकरांना शांत राहण्याचे केले आवाहन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांची काल (२५ फेब्रुवारी) बैठक पार पडली. गृहमंत्र्यांच्या बैठकीत दिल्लीकरांना शांततेचे आवाहन करण्यात आले. तर केजरीवाल यांनीही आप आमदारांची बैठक बोलावली. काल दिवसभराच्या जाळपोळीच्या घटनाक्रमानंतर एक हजारांपेक्षा जास्त सशस्त्र पोलिसांनी संपूर्ण ईशान्य दिल्लीचा ताबा घेतला.
तणावग्रस्त भागात बारावीच्या परीक्षा रद्द
दिल्लीत हिंसाचारामुळे सीबीएसई बोर्डाने आज (२६ फेब्रुव्रारी) होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. “तणावग्रस्त ईशान्य दिल्लीत आज शाळा बंद राहतील. सोबतच सीबीएसई ची आज होणारी परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली आहे”, असे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले होते. त्यानंतर आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.