HW News Marathi
देश / विदेश

राफेलविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळल्या

नवी दिल्ली | राफेल खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदीला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेलविरोधात पुनर्विचार याचिकेवर आज (१४ नव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून फ्रान्सकडून ३६ राफेल विमान खरेदीप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायालायने पुन्हा फेटाळून लावल्या आहेत. याप्रकरणीचा निकाल मे महिन्यात राखून ठेवण्यात आला होता. राफेल खरेदी व्यवहारामध्ये मोदी सरकारने मोठा घोटाळा केला आहे, असा जाहीर आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकात केला होता. राहुल गांधींनी प्रचारातदरम्यान त्यांनी राफेलवरून मोदींवर तोफ डागली होती.

फेल विमान खरेदी व्यवहार वैध असल्याचा निकाल न्यायालायने १४ डिसेंबर २०१८ला दिला होता. राफेल विमान खरेदीतील निर्णय प्रक्रिया स्पष्ट आहे. त्यात संशयाला कुठलाही जागा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. परंतु या निकालावर फेरविचार करणाऱ्या काही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. दाखल केलेल्या सर्व फेरविचार याचिका न्यायालयाने यावेळी सुनावणीत फेटाळून लावल्या. भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी केलीय. हा विमान खरेदी व्यवहार ५८ हजार कोटी रुपयांचा आहे.

चौकीदार चोर, राहुल गांधींचा मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप

या व्यवहारात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच देशाचा चौकीदार चोर आहे असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. थेट पंतप्रधानांवर पहिल्यांदाच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी रान उठविले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरजे मलिष्कावर भारतीय भडकले! नेमकं काय झालं?

News Desk

माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न – प्रवीण तोगडिया

swarit

नवे मंत्री आज आपल्या पदाचा कारभार हाती घेणार; पंतप्रधानांनी बोलावली बैठक

Jui Jadhav