HW Marathi
देश / विदेश

ममता बॅनर्जी आक्षेपार्ह फोटो प्रकरणी प्रियांका शर्माला जामीन मंजूर

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर शेअर केल्या प्रकरणी भाजप कार्यकर्ता प्रियांका शर्माची सर्वोच्च न्यायालयाने जामीन मिळाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात मेट गाला या फॅशन शोमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने हजेरी लावली होती. प्रियांकाने यात केलेल्या विचित्र मेकअप केला होता. फोटोवर ममता बॅनर्जींचा चेहरा लावण्यात आला होता. या प्रकरणी बंगाल सरकारने प्रियांकाला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. यानंतर प्रियांकाची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाल्यानंतर तिने ममता बॅनर्जीची माफी मागावी, असे न्यायालयाने सांगितले आहे.

अमेरिकेत पार पडलेल्या मेटगाला या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हजेरी लावली होती. प्रियांकाने या फॅशन शोमध्ये विचित्र मेकअप केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिला नेटीझन्सने ट्रोल केले जाऊ लागले. प्रियांकाच्या मेटगालामधील फोटोचे विविध प्रकारचे मिम्स भारतात सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले. तृणमूल काँग्रेसचे नेता विभास हाजरा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शर्मा यांना अटक करण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत १० मे रोजी ही अटक करण्यात आली होती.

 

Related posts

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

News Desk

ट्विटरवर जगात सर्वाधिक ‘फेक’ फॉलोअर्स नरेंद्र मोदींचे!

News Desk

पाकिस्तानसारख्या बदमाश देशाला चोरून प्रेमपत्र पाठवायची आवश्यकता काय ?

News Desk