नवी दिल्ली | फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याच्या निर्णयाबाबात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आलेली नाही. परंतु ऑनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात लावलेली आहे. शिवाय, महत्त्वाचे म्हणजे दिवाळी आणि सणात मात्र रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासाचाच अवधी देण्यात आला आहे.
The Supreme Court, in its order, banned the online sale of firecrackers and put a stay on the e-commerce portals from selling firecrackers. https://t.co/D6daxnGRqD
— ANI (@ANI) October 23, 2018
तर नाताळ आणि नवीन वर्षासाठी नागरिकांना रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. केवळ दिवाळीच नाही, तर प्रत्येक सण-उत्सवांसाठी हा नियम लागू असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जस्टिस एके. सिकरी आणि जस्टिस अशोक भूषण यांनी २८ ऑगस्ट रोजी यावर निर्णय राखून ठेवला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.