HW News Marathi
देश / विदेश

‘ताजमहाल’चं नामकरण ‘राम महाल’ होणार, भाजप आमदाराचा दावा

आग्रा | देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाल्यापासून देशातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि शहरांच्या नामकरणाचा सपाटाच लावला आहे. दोनच दिवसांपूर्वी आग्रातील ताज महाल परिसरात हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी येथील लोकांना प्रार्थना म्हणायला लावली होती. याप्रकरणात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे प्रकरण ताजं असताना भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं खळबळजनक दावा केला आहे. लवकरत ताजमहालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भाजपच्या आमदाराचं नाव सुरेंद्र सिंह असून ते उत्तर प्रदेशातील बैरिया मतदार संघातून भाजपचे निर्वाचित आमदार आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी यावेळी म्हटलं की, ताज महाल ही वास्तू पूर्वी शंकराचं मंदिर होतं. त्यामुळे लवकरचं ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातचं हे नामकरण केलं जाईल, असा दावाही सुरेंद्र सिंह यांनी केला आहे.

यावेळी सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुला छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, “शिवाजीचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत अवतरले आहेत. समर्थ गुरु रामदासांनी ज्याप्रमाणे भारताला शिवाजी दिला, त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिलं आहे.” ताज महालचं नामकरण कृष्णा महाल किंवा राम महाल करावं, अशी मागणी अलीकडेच सुरेंद्र सिंह यांनी केली होती. यानंतर त्यांनी पून्हा एकदा याचीच री ओढली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागणार” – मोहन भागवत यांचं मोठं विधान

News Desk

मल्लिकार्जुन खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

Darrell Miranda

विकासासाठी राज्य-केंद्र अशा दोन्हीकडे एकाच विचारांचं सरकार असावं! – पंतप्रधान मोदी

News Desk