HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावात भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल, निवडणुकीच्या आधीच भूकंप

जळगाव | राज्यात सध्या निवडणुकीचे वारे पाहू लागले आहेत. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप पाहायला मिळतातच. जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. भाजपचे ५७ पैकी तब्बल २७पेक्षा अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा आहे. याबाबत भाजपच्या सूत्रांनी देखील दुजोरा दिला. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक सहलीवर गेले आहेत.

जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला संपणार आहे. येत्या १८ मार्चला नवीन महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी काल (१५ मार्च) माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर गेले. रविवारी दुपारी २ वाजेपासून भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते. त्यामुळे आता जळगावातील राजकीय घडामोड कोणतं वळण घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात, केबल चालक राज ठाकरेंच्या भेटीला

News Desk

मुख्यमंत्र्यांचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते – राधाकृष्ण विखे पाटील

News Desk

इंदापूर तालुक्यात एका महिलेने राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचीच पकडली कॉलर

News Desk