HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेत्याची आणीबाणीची पोस्टरबाजी

नवी दिल्ली | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपकडून १९७५च्या आणीबाणी केली जात आहे. त्यातच आता भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी चक्क दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० चा लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पोस्टर लावलं आहे.

महाराष्ट्र भाजपकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच दिल्लीतील भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत महाराष्ट्रात आणीबाणी २.० लागल्याचा दावा केला. महाराष्ट्र सदनाबाहेर लावण्यात आलेल्या या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो आहेत. ‘आणीबाणी २.०मध्ये आपलं स्वागत आहे,’ असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणी घर देता का घर !

News Desk

४५३ कोटी जमा करा, अन्यथा ३ महिने शिक्षा भोगा | सर्वोच्च न्यायालय

News Desk

डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची प्रकृती बिघडली

News Desk