HW News Marathi
देश / विदेश

चिराग पासवान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यासाठी लोजप नेते उत्सुक

पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या तापले आहे. एनडीएचा भाग असलेल्या लोक जनशक्ती पक्षाने आघाडी आणि जागावाटपाविषयी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यासाठी लोजप नेते उत्सुक आहेत. त्यामुळेच लोजप आता एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात देण्यात आले आहे.

सलग दुसऱ्यांदा खासदारपदी विराजमान झालेले चिराग पासवान हे लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतात. चिराग यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे लोजपचे संस्थापक आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी पक्षाची जबाबदारी मुलाच्या खांद्यावर सोपवली होती. संसद गाजवणाऱ्या चिराग पासवान यांनी आता बिहारची कमान सांभाळावी, अशी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री अमित शाहांची भेट घेणार

Aprna

प्रियांका गांधी वॉड्राला उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

केंद्रीय कॅबिनेटने मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून आता २१ वर्ष करण्याच्या विधेयकाला दिली मंजुरी

News Desk