HW News Marathi
देश / विदेश

कराचीत आतंकवादी हल्ला, २ पाक पोलिसांचा मृत्यू

पाकिस्तान | कराचीच्या क्लिफ्टन भागात चीनी दूतावासाजवळ आज (शुक्रवार) सकाळी आतंकवादी मोठा हल्ला करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता (९:३० पाकिस्तानी वेळेनुसार) झाले. घटनास्थळी प्रचंड पोलीस फोर्स आणि रेंजर्स पाठविण्यात आले असून अज्ञात हमलेखोर आणि सुरक्षाबल यांच्या दरम्यान चकमक सुरू असल्याची खबर मिळत आहे. या चकमकीत पाकिस्तानच्या दोन पोलीस कर्मचारी ठार झाल्याची माहिती जिओ न्यूजकडून देण्यात आली आहे. तसेच या हल्ल्यात आतापर्यंत ३ लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

कराचीच्या क्लिफ्टन परिसरात अनेक देशांची कार्यालये असल्याने पाकिस्तानी पोलीस आणि पाक रेंजर्स यांनी या परिसराला घेरले असून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ३ ते ४ च्या संख्येत हल्लेखोर चीनी काउन्सलेटमध्ये प्रवेश करणे प्रयत्नशील होते. सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर फायरींग करत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. या आतंकवादी हल्लाबद्दल सिंध प्रांतचे राज्यपाल इमरान इस्माईल यांनी पोलिसांकडून अहवाल मागितला आहे. तसेच राज्यपालांनी सिंध प्रांतचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्याशी या हल्ल्याबाबत संपर्क साधून घटनेची चोकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप माहिती नाही. पण, पाकिस्तानमधील सुरक्षा रक्षकांना घटनास्थळाला घेराव घातला असून पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही कलम ३७१ ला हातही लावणार नाही, अमित शाहांचे आश्वासन

News Desk

शबरीमला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडणार ?

swarit

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा!

News Desk