HW News Marathi
देश / विदेश

थरुर प्रेयसींना कसे भेटणार | सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली | सुनंदा पुष्कर प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टाने काँग्रेस खासदार शशी थरुर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने थरुर यांना देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. कोर्टाच्या या निर्णयावरुन भाजप नेते सुब्रुमण्यम स्वामी यांनी म्हटले की, थरुन यांना आता त्यांच्या देशाबाहेरली प्रेयसींना भेटता येणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक करण्याच्या भितीने थरुर यांनी मंगळवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर गुरुवारी (आज) सुनावणीत एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगी शिवाय देश सोडून जाण्यास थरुर यांना मनाई केली आहे.

तसेच थरुर हे तिहार जेलमध्ये नाहीत, ते सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासोबत बसू शकतात. ते सुद्धा बेलवाले असल्याचे बोलून सुब्रुमण्यम स्वामींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

सुनंदा पुष्कर प्रकरणात थरुर त्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एसआयटीनेही चौकशी पूर्ण केलेली आहे. न्यायालयाने ५ जूनला थरुर यांना समज बजावून ७ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. या सुनावणी दरम्यान पुरेसे पुराव्या अभावी त्यांच्या विरोधात कारवाई करता येऊ शकत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामा येथील चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

युट्यूब बंद पडते तेव्हा

swarit

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk