लखनऊ | “भारतात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्या लोकांना बॉम्बने उडवून दिले पाहिजे.” असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशतील मुजफ्फरनगरमधील एक भाजप आमदार विक्रम सैनी यांनी केले आहे. पुढे सैनी असे देखील म्हणाले की, “माझ्याकडे एखादे मंत्रालय दिल्यास अशा सर्वच माणसांना मी बॉम्बने उडवून देईन. आणि हे माझे वैयक्तिक मत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.”
#WATCH Vikram Saini, BJP MLA from Muzaffarnagar says 'My personal view is that those who say they feel unsafe and threatened in India should be bombed, give me a ministry and I will bomb all such people, not even one will be spared' pic.twitter.com/E9yWNH7MBF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 4, 2019
गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेता नसिरुद्दीन शहा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, देशातील मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. बुलंदशहरमध्ये कथित गोहत्येच्या प्रकरणात हिसेंमध्ये पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाली होती. त्यानंतर या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मी पण देशभक्त आहे. पण मला गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही.
नसिरुद्दीन शहा नेमके काय म्हणाल्या
बुलंदशहर गोहत्या प्रकरणावरून अभिनेता नसीरुद्दीन शहांनी देशातील घडामोडींवरही भाष्य केले होते. “देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,” असे शहांनी एका डिजिटल चैनलशी बोलताना म्हणाले होते. “उद्या माझ्या मुलांना जमावाने घेरले आणि त्यांना तू हिंदू की मुस्लीम असे विचारले तर त्यांच्याकडे त्याचे उत्तर नसेल, त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता वाटतेय. कारण मी माझ्या मुलांना कधीच धार्मिक शिक्षण दिले नाही. चांगले आणि वाईटाचा धर्माशी काहीच संबंध नसतो,” असे शहा यांनी म्हटले आहे. बुलंदशहरमध्ये (३ डिसेंबर) गोहत्येवरुन तणाव निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. यामध्ये पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला.
नसीरुद्दीन शहा यांना अनुपम खरे यांचे प्रत्युत्तर
नसीरुद्दीन शहा यांच्या वादग्रस्त विधानानंतर अभिनेता अनुपम खेर यांनी खरपूस समाजार घेतला होता. अनुपम म्हणाले की, देशात इतके स्वातंत्र्य आहे की, इथे लष्करावर दगड भिरकावले जाऊ शकतात. हवाईदल प्रमुखाला शिव्याशाप दिल्या जाऊ शकतात. तुम्हाला एका देशात आणखी किती स्वातंत्र्य हवे?, अशा शब्दात शहा यांना उद्देशून टीका केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.