HW News Marathi
देश / विदेश

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | अभिनेते आणि दक्षिण भारतीय सिनेमाचे सुपरस्टाररजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर चहुबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रजनीकांत राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं समजत होते. ते स्वत:चा राजकीय पक्षही ३१ डिसेंबरला घोषित करणार होते. मात्र, त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी राजकारणात येण्याच्या विचारावरुन माघार घेतेली होती. रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होतं. टीममधील चार सदस्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समजल्यानंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर रजनीकांत यांनी चेन्नईतील आपल्या फार्महाऊसमध्ये आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला होता.

काय म्हणाले प्रकाश जावडेकर?

यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार महानायक रजनीकांत यांनी घोषित करताना आनंद होत आहे. चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारास दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित होतो. यंदाही हा पुरस्कार कोणाला द्यायचा यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये ज्येष्ठ संगीतकार आशा भोसले, मोहनलाल, विश्वजीत चटर्जी, शंकर महादेवन, सुभाष घाई यांचा समावेश होता. या समितीने एकमताने महाननायक रजनीकांत यांना पुरस्कार देण्याची शिफारस केली. त्यामुळे रजनीकांत यांच्या नावाने पुरस्कार घोषित करण्यात आला. गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ अभिनेते रजनीकांत सिनेसृष्टीत तेजस्वी सूर्यसारखे चमकत आहेत. प्रतिभाशक्ती, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आज रजनीकांत यांनी लोकांच्या मनात घर केले. त्यांमुळे त्यांना हा पुरस्कार देत योग्य गौरव केला जात आहे. असे जावडेकर म्हणाले.

सिनेसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार यासाठी महत्वाचा आहे, कारण भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला सिनेमा ‘राजा हरिशचंद्र’ हा १९१३ म्हणजे १०८ वर्षापूर्वी तयार झाला होता. या चित्रपटामुळे दादासाहेब फाळके यांना चित्रपट महर्षी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या मृत्यू पश्चात हा पुरस्कार दिला जातो. आजपर्यंत ५० वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. यंदाचे हे ५१ वे वर्ष आहे. असेही जावडेकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिंदूस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश”-संभाजी भिडे

News Desk

अटलजींनी नेहरूंचा हटवलेला फोटो पुन्हा लावायला सांगितला…. आज अटलजींची जयंती !

News Desk

पंतप्रधानांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

News Desk