HW News Marathi
देश / विदेश राजकारण

धनुष्यबाणावर निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा जोरदार युक्तीवाद

मुंबई | शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे यावर निवडणूक आयोगासमोर (Election Commission of India) आज सुनावणी सुरू आहे. आयोगासमोर आज (20 जानेवारी) सायंकाळी 4 वाजता सुनावणीला सुरुवता झाली.  तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पक्षासोबत केलेल्या बंडानंतर शिवसेनेचा पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह तातपुर्ते गोठविले होते. यानंतर ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले. यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मुळ चिन्हावर ठाकरे गट आणि शिंदे गटाने दावा केला आहे. यातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला संपुष्टात येत आहे.

 

यामुळे ठाकरे गटाने प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी आयोगाकडे मागितली आहेत. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बला यांनी 1 तास आयोगासमोर ठाकरे गटाच्या बाजून मांडली. आयोगासमोर शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी बाजू मांडणार आहेत. दरम्यान, शिंदेना घटना मान्य नाही तर पक्षाचे नेते पद कोणत्या आधारावर?, जर घटना अवैद्य असेल तर मग पक्षाचे नेते पद कसे वैद्य?, असा प्रश्न सिब्बल यांनी आयोगासमोर मांडले. शिवसेनेची घटना बेकायदेशीर हा शिंदेचा दावा कोणत्या आधारे? त्याला काय आधार आहे?, त्याला काय निकष आहे, असा सवाल सिब्बल यांनी विचारला आहे. राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने काही कागदपत्रे आयोगाकडे सादर केलेली आहे का?, असे सवाल सिब्बल यांनी आदी मुद्दे आयोगासमोर मांडले.

 

ठाकरे गटाचा आयोगात युक्तीवाद

 1. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या संख्याबळचा दावा खोडून काढला
 2. शिंदे गटाने आयोगासमोर कोण कोणत्या गोष्टी सादर केलेल्या आहेत, अशी माहित कपिल सिब्बल यांनी विचारली आहे.
 3. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाने प्रतिनिधी सभेमुद्दा उपस्थित केला आहे. कारण ठाकरे गटाची प्रतिनिधी सभा ही घटनेला अनुषंगाने आहे.
 4. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीचा मुद्दा उपस्थित आयोगासमोर उपस्थि केला गेला. आणि आमची कार्यकारणी ही वैद्य आहे. ती घटनेला धरुन आहे, असेही कपिल सिब्बल यांनी आयोगासमोर मुद्दा मांडला.
 5. ठाकरे गटाकडून प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी आयोगाकडे केली आहे.
 6. राष्ट्रीय कार्यकारणीला मुदतवाढ द्या अथवा निवडणूक घ्या, असे कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजून युक्तीवाद केला.
 7. विधीमंडळ आणि राजकीय पक्षाची कपिल सिब्बल यांच्याकडून तुलना आलेली आहे.
 8. विधीमंडळ आणि राजकीय पक्षात ठाकरे गटाचे संख्याबळ जास्त असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले.
 9. कपिल सिब्बल यांनी विधीमंडळ पक्षातील संख्याबळाची निवडणूक आयोगासमोर माहिती दिली आहे.
 10.   उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे. यामुळे पक्षप्रमुख पदाच्या कार्यकाळाला मुदत वाढ द्या
 11. प्रतिनिधी सभा मुळ पक्ष चालवितो, कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला आहे.
 12. पक्ष सोडून केलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही, घटनेनुसार प्रतिनिधीसभा ही आमच्याकडेच आहे, असे ठाकरे गटाच्या कपिल सिब्बल यांनी आयोगासमोर मांडले.
 13. शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच अस्तित्वात नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने केले आहे.
 14. शिवसेनेत आतापर्यंत झालेली कार्यवाही प्रतिनिधी सभेनुसार अर्थात घटनेनुसार असल्याची माहिती ठाकरे गटाने दिली आहे.
 15. शिवसेनेची कार्यवाही कागदपत्रावर उपलब्ध आहेत, ते पाहू शकता. तशी शिंदे गटाची कार्यवाही कागदपत्रावर उपलब्ध आहे का?, असा सवालही ठाकरे गटाने शिंदे गटाला केला आहे.
 16. राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने काही कागदपत्रे आयोगाकडे सादर केलेली आहे का?, ठाकरे गटाकडून सवाल केला आहे.
 17. शिंदे गटाने आयोगाकडे जमा केलेली प्रतिज्ञापत्रही तपासून पाहा, ठाकरे गटाकडून मागणी केली आहे.
 18. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटना आयोगासमोर जाहीर करण्यात आली.
 19. घटनेचा आधारे शिवसेना कशा पद्धतीने पुढे जात आहे, हे दाखविण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न केला.
 20. ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त होऊ शकत नाही. कारण ठाकरे गट हे घटनेच्या आधारे चालले असल्याचा दावा त्यांनी केला.
 21. हा संपूर्ण वाद म्हणजे देशाच्या संसदीय पद्धतीची थट्टा आहे. तर शिंदे गटाची कार्य पद्धती म्हणजे देशाच्या संसदीय पद्धतीची खिल्ली आहे, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले.
 22. शिंदे गटाने नेमलेली कार्यकारणी बेकायदेशीर आहे, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले.
 23. शिवसेनेची घटना बेकायदेशीर हा शिंदेचा दावा कोणत्या आधारे? त्याला काय आधार आहे?, त्याला काय निकष आहे, असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.
 24. शिंदेना घटना मान्य नाही तर पक्षाचे नेते पद कोणत्या आधारावर?, जर घटना अवैद्य असेल तर मग पक्षाचे नेते पद कसे वैद्य?, असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.

 

Related posts

पार्थ पवारांची ‘ती’ भूमिका व्यक्तिगत, आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास !

News Desk

#PulwamaAttack : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर

News Desk

पेट्रोलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ

News Desk