HW News Marathi
देश / विदेश

‘ट्राय’च्या नव्या नियमाविरोधात केबल व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली | वाहिनीनुसार पैसे घेण्याच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे ‘ट्राय’ने केबल टीव्ही, डीटीएच दराबाबत घेतलेल्या निर्णयाला केबल व्यावसायिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यासाठी बुधवारी(२६ डिसेंबर) तातडीची बैठक बोलावली आहे. ट्रायच्या नव्या नियमांविरोधात केबल व्यावसायिकांनी २७ व २८ डिसेंबर रोजी ब्लॅक आउट म्हणजे वाहिन्यांचे प्रसारण बंद करण्याचा आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्या(२७ डिसेंबर) टीव्हीवरील कार्यक्रमांना प्रेक्षक मुकावे लागणार आहे.

देशभरात ट्रायने २९ डिसेंबरपासून केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, ट्रायचा हा निर्णय केबल व्यावसायिकांना उद्धवस्त करणारा असून ब्रॉडकास्टर यांच्या हिताचा असल्याचा आरोप केबल व्यावसायिकांनी केला आहे. काही ठिकाणी हे आंदोलन सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणार असल्यामुळे प्रेक्षकांना प्राइम टाइम मालिका पाहता येणार नाहीत. तर, २९ डिसेंबरपासून सशुल्क वाहिन्यांचे प्रसारण केबल चालक बंद करणार आहेत.

‘ट्राय’ने वाहिन्यांचे दर ठरवताना ग्राहक-केबल व्यावसायिक-बहुविध यंत्रणा चालक यांचा विचार केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. सशुल्क वाहिन्यांच्या उत्पन्नातील ८० टक्के वाटा हा केबल व्यावसायिक आणि २० टक्के वाटा बहुविध यंत्रणा चालकांना मिळणार आहे. यामुळे केबलचालकांचे नुकसान होणार आहे. उत्पन्न वाटपातील प्रमाण हे ब्रॉडकास्टर ३० टक्के, केबल व्यावसायिक ४० टक्के आणि बहुविध यंत्रणा चालकांना ३० टक्के देण्यात यावे अशी मागणी ‘ट्राय’कडे करण्यात आली आहे. हा बदल केला नाही, तर छोटे केबल व्यावसायिक या क्षेत्रातून हद्दपार होतील, अशी भीती केबलचालक वर्तवत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव! – सुप्रिया सुळे

Aprna

1 एप्रिल म्हणजे मोदींचा वाढदिवस; राष्ट्रवादीकडून अनोखा वाढदिवस साजरा!

News Desk

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेतील सीट्स रिकाम्याच रिकाम्या 

News Desk