HW News Marathi
देश / विदेश

तेलंगणा विधानसभेच्या मतदानाला सुरुवात

मुंबई | शुक्रवारी तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीत एकूण २.८० कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ३२, ८१५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ट्रान्झेंडरसह एकूण १ ८२१ उमेदवार निवडणूकीच्या रींगणात आपले नशीब आजमावत आहेत. ११ डिसेंबर रोजी या मतमोजणी होणार आहे.

टीआरएस प्रमुख के चंद्रशेखर यांच्या पक्षाकडून १०७ जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. या ठिकाणी कॉंग्रेस महागठबंधनच्या अंतर्गत ९४ सीटांवर लढत आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुका २०१९ मध्ये होणार होत्या परंतु मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधान सभा भंग केल्यामुळे आता राज्य विधानसभा निवडणुका चार राज्यांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थानमध्ये होत आहेत. डिसेंबर ११ रोजी सर्व पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी मोफत शिक्षण, दरमहा स्टायपेंड, १०लाखांची मदत, केंद्राची घोषणा!

News Desk

“…फक्त मोदींची दाढीच वाढतेय”, ममता बॅनर्जींचा मोदींना खोचक टोला!

News Desk

सरकारी बँकांचे खासगीकरण होणार, पंतप्रधानांचे संकेत

News Desk