HW News Marathi
देश / विदेश

भाजपा खासदाराने फडकविला उलटा तिरंगा

उत्तर प्रदेश – तिरंग्याचा अवमाना होऊ नये म्हणून रोजच प्रत्येक जण काळजी घेत असतो. भाजपाच्या महिला खासदाराने मात्र उलटा झेंडा फडकावून स्वातंत्र्यदिनीच तिरंग्याचा अपमान केला आहे. उत्तर प्रदेशमधील धौरहरा येथील भाजपा खासदार रेखा वर्मा यांनी ध्वजवंदन करताना उलटा झेंडा फडकावला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. सितापूरमधील महोली येथी पिसावा ब्लॉकमधील आहेत.

भाजपा गेल्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये तिरंगा यात्रा काढत आहे. यात भाजपा आमदार – खासदारांपासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत सर्व सहभागी झाले होते. रेखा वर्मा यांनीही सितापूरमधील महोली परिसरात तिरंगा यात्रेचं आयोजन केले होते. मात्र तरीही त्यांना तिरंगा कसा फडकवायचा याचे ज्ञान नसल्याने त्यांच्या जोरदार टीका होत आहे.

कायद्यानुसार एखादी व्यक्ती राष्ट्रचिन्ह तसेच राष्ट्रध्वजाचा तोंडी किंवा लिखित अपमान करत असेल, तर त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि दंड दोन्ही होऊ शकतो. यामध्ये काही तांत्रिक बाबीही आहेत. खासदार रेखा वर्मा यांच्यावर या कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वागुरा नौगाम सेक्टरमध्ये ग्रेनेड हल्ला, सीआयएसएफचा अधिकारी शहीद

swarit

“मुख्यमंत्री मरु द्या, आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या”- पालकमंत्री भरणे

News Desk

वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा वैमानिक शहीद

News Desk