HW News Marathi
देश / विदेश

संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून सुरू

नवी दिल्ली। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रात होणार आहे. आज (३१जानेवारी) अधिवेशनाची सुरुवात ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होणार आहे. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२१-२०२२ सादर करणार आहेत. अर्थमंत्री या उद्या (१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. कोरोनामुळे देशाची आर्थिकवर मोठा फटका बसला आहे. यामुळे अर्थसंकल्पातून सर्व सामान्यांन आणि उद्योगपती किती दिलासा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सध्या देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. या दरम्यान, अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोनामुळे देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन सत्रात होणार आहे. त्याचप्रमाणे संसदेचे कामकाज प्रत्येक पाच तास होणार आहे. यात लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत आणि राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत चालणार आहे. 

 गेल्या काही काळापासून देशात महागाईचा दरत वाढली आहे. २०२१मध्ये डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५९ टक्के आणि घाऊक महागाई दर१३.५६ टक्के इतका आहे. पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाच्या खरेदीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात हा मुद्द्यावर चर्चा होणार असून यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारे धरतील. तसेच संसदेत शेतकरी प्रश्न, महागाई, बेरोजगारी, चीनची घुसखोरी आदी विषयांवरही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रेमी युगूलाची दगडाने ठेचून हत्या

News Desk

थरुर प्रेयसींना कसे भेटणार | सुब्रमण्यम स्वामी

News Desk

एलआयसीची आयडीबीआय बँकेला मदत,गुंतवणार १२ हजार कोटी

News Desk