मुंबई | देशात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. तर आणि ३ हजार ३०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच जगात कोरोनाग्रस्त देशाच्या यादीत भारत १० व्या क्रमांकावर आला आहे. तसेच इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) यांच्या आज (२० मे) पत्रकार परिषदेत कोरोना रुग्णांच्या शरीरातून कोरोना व्हायरस होण्याचा धोका आहे का?, कोरोना रुग्णांच्या मृतदेहात व्हायरसचे कितीवेळ राहतो?, या प्रश्नावर विचरण्यात आले. त्यावर इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) म्हणाले, ” कोरोना रुग्णाच्या मृतदेहात व्हायरस हळूहळू कमी होतो. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागतो, तो पूर्णपणे कधी नष्ट होतो, याचा कालावधी निश्चित नाही. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत
यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरीही परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज (२० मे) दिले आहे. अग्रवाल म्हणाले, जगातील १० देशांमध्ये भारतापेक्षा जास्त केसेस आहेत. त्याच बरोबर इतर देशांमध्ये मृत्यूदरही जास्त आहे. कोरोना प्रभावित जगातल्या १५ देशांची लोकसंख्या ही १४२ आहे. भारतात १ लाख बाधित असताना जगाची संख्या ही ३६ लाख आहे. भारताच्या लोकसंख्ये एवढी त्यांची संख्या असूनही त्या देशांमध्ये भारतापेक्षा ८३ टक्के अधिक मृत्यू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
4.2 people per lakh population across the world have died due to #COVID19. In India it is 0.2 deaths per lakh population: Lav Agarwal, Union Health ministry joint secretary https://t.co/SOarbZrQ3h
— ANI (@ANI) May 20, 2020
कोरोना रुग्णाच्या मृतदेहात व्हायरस हळूहळू कमी होतो.
कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहातून कोविड १९ पसरतो. यामुळे कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू दिले जात नाही. मात्र, यासंदर्भात कोरोना रुग्णांच्या शरीरातून कोरोना व्हायरस होण्याचा धोका आहे का?, कोरोना रुग्णांच्या मृतदेहात व्हायरसचे कितीवेळ राहतो?, या प्रश्नावर इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहात व्हायरस हळूहळू कमी होतो. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागतो, तो पूर्णपणे कधी नष्ट होतो, याबद्दल निश्चित माहिती नाही. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही आयसीएमआरने दिल्यात. त्यामुळे मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी आवश्यक ती सर्व काळजी घ्यायला हवी.
When the first lockdown started, then recovery rate was around 7.1%, the recovery rate during 2nd lockdown was 11.42%, it then rose to 26.59%. Today the recovery rate is 39.62%: Lav Agarwal, Union Health ministry joint secretary #COVID19 pic.twitter.com/p3ebJM6VIp
— ANI (@ANI) May 20, 2020
लॉकडाऊनदरम्यान कोरोनामुक्त होण्याऱ्याची टक्केवारी
देशात कोरोना रुग्ण बरा होण्याचे प्रमाण हे ३९.६२ टक्के आहे. ही अतिशय चांगली घटना असल्याचेही त्यांनी सांगितले.पहिल्या लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा कोरोना बरे होण्याचे प्रमाण ७.१ टक्के होते. दुसऱ्या लॉकडाऊनदरम्यान हे प्रमाण ११.४२ टक्क्यांवर गेले. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण २६.५९ टक्के होते तर सध्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३८.६२ टक्के आहे, अशी माहिती अगरवाल यांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.