HW News Marathi
देश / विदेश

प्रियकराचा मृतदेह गाडून लावले कोबीचे रोप

छत्तीसगड : आपल्या माजी प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर आरोपीमहिलेने त्याचा मृतदेह अंगणात गाडला. तसेच त्यावर कोबीचे रोप लावले, हा प्रकार रायपूरमध्ये दोन वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. आता या प्रकरणावरील सुनावणी न्यायालयात सुरू झाली आहे. मात्र आरोपींवर आतापर्यंत आरोपनिश्चिती झालेली नाही.

छत्तीसगडच्या शंकरा ग्रुप ऑफ कॉलेजचे संचालक अभिषेक मिश्रा ९नोव्हेंबर २०१५ पासून बेपत्ता होते. त्यांची कार रायपूर एअरपोर्टवर सापडली होती.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाच्या तपासावर जातीने लक्ष ठेवले होते. अखेर किस्मी उद्योजक विकास जैन यांची पत्नी किस्मी जैन हिच्याशी त्यांचा संपर्क झाल्याचे मोबाइल डिटेल्सवरून कळले. किस्मी पूर्वी अभिषेकच्या ग्रुपमध्ये काम करायची. तेव्हा त्याचे प्रेम प्रकरण होते.

पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यावर मृतदेह किस्मीच्या घरातील गार्डनमध्ये आढळला. मृतदेह दफन करून त्यावर फुलकोबीचे रोपटे लावण्यात आले होते. अभिषेक २०० कोटींच्या शंकरा ग्रुप ऑफ ऑफ कॉलेजमध्ये संचालक होता आणि छत्तीसगडी सिनेमे प्रोड्युस करत होता. किस्मीने सांगितले की,अभिषेक मला ब्लॅकमेल करत होता. पुन्हा शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे किस्मीने अभिषेकला ९ नोव्हेंबरला आपल्या फ्लॅटवर भेटायला बोलावले. अभिषेक घरी कुणाला काहीही न सांगता तिथे गेला. तिथे किस्मीचा काका विकासने रॉडने अभिषेकच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा खून केला. खुनानंतर विकासने आपल्या सासरवाडीतच गार्डनमध्ये त्याला दफन केले आणि किस्मीने कबरीवर कोबीचे रोप लावले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका दगडामुळे मच्छीमार झाला अब्जाधीश

News Desk

सगल तीन दिवस बँका रहाणार बंद

News Desk

बॉलिवूड ड्रग कनेक्शनमधून भाजप अँगल गायब कसा?सचिन सावंत यांचा सवाल..

News Desk